अमरावती- हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ लाखापर्यंत कोणत्याही प्रकारची अट न लावता शेतकरी कर्जमाफी केली. त्यामुळे, शिवसेना तिवसा विधानसभा संघटक विलास माहुरे यांच्या नेतृत्वात आज सायंकाळी तिवसा येथे शेतकऱ्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला. यात शेतकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला आणि कर्जमाफीचे स्वागत केले.
कर्जमाफीनंतर तिवसा येथील शेतकऱ्यांचा जल्लोष; एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त - shivsena tivsa news
तिवसा येथीस पोलीस ठाण्याजवळ शिवसेना कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर, सरकारचा निर्णय व माहाविकास आघाडीच्या विजया बाबत घोषणा दिल्या.
भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आले व राज्यात माहाविकास आघाडीची सरकार स्थापन केली. त्यामुळे, नापिकी, दुष्काळ व कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीसाठी कोणत्याही प्रकारची अट, निकष न लावता २ लाखापर्यंत कर्जमाफी केली. त्यामुळे, तिवसा येथीस पोलीस ठाण्याजवळ शिवसेना कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर, सरकारचा निर्णय व माहाविकास आघाडीच्या विजया बाबत घोषणा दिल्या.
हेही वाचा-अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न