अमरावती -अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव परिसरात असलेल्या स्टोन क्रशरच्या धुळीमुळे, स्टोन क्रशर यंत्राच्या शेजारी शेत असलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. या संदर्भात महसूल प्रशासनाकडे अनेक तक्रारी करून देखील, प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे अखेर या 74 वर्षीय शेतकऱ्यावर प्रशासनाविरोधात उपोषण करण्याची वेळ आली आहे, रुपराव मांडवगणे असे या वृद्धाचे नाव आहे.
नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्याचे उपोषण - Crop damage due to stone crusher
अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव परिसरात असलेल्या स्टोन क्रशरच्या धुळीमुळे, स्टोन क्रशर यंत्राच्या शेजारी शेत असलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. या संदर्भात महसूल प्रशासनाकडे अनेक तक्रारी करून देखील, प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे अखेर या 74 वर्षीय शेतकऱ्यावर प्रशासनाविरोधात उपोषण करण्याची वेळ आली आहे.
5 दिवसांपासून शेतकऱ्याचे उपोषण
रुपराव मांडवगणे यांनी नुकसानभरपाईच्या मागणीसाठी धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे उपोषणाला 5 दिवस उलटून देखील त्यांच्या उपोषणाची अद्याप प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही. प्रशासनाची परवानगी न घेता, या परिसरात क्रशरसाठी बास्टिंग करण्यात आले, व नंतर परवानगी घेण्यात आली. यामुळे आपल्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व आपल्याला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान जोपर्यंत नुकसान भरपाई मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.