महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परतीच्या पावसाने उद्ध्वस्त केले पीक, सत्ता स्थापनेच्या घोळात शेतकरी वाऱ्यावरच - पीकविम्याच्या प्रतिक्षेत शेतकरी

गेल्या काही दिवसात कोसळलेला परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. हाती आलेली पिके वाया गेली. जिल्ह्यात ३ लाख ७३ हजार क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदत करण्याचे आश्वासनही दिले. मात्र, अद्याप कोणतीही मदत न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

खराब झालेले पीक

By

Published : Nov 13, 2019, 7:33 PM IST

Updated : Nov 14, 2019, 7:10 PM IST

अमरावती - परतीच्या पावसाने राज्यात चांगलाच धुमाकूळ माजवला. ठिकठिकाणी पीकांची नासाडी झाल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले. अमरावती जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली असून आत्तापर्यंत विविध नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र, अद्याप कोणतीही मदत न मिळाली नसल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे.

सत्ता स्थापनेच्या घोळात शेतकरी वाऱ्यावरच

गेल्या काही दिवसात कोसळलेला परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. हाती आलेली पिके वाया गेली, त्यामुळे पुन्हा एकदा नैसर्गिक संकटाने शेतकरी खचला आहे. जिल्ह्यात ३ लाख ७३ हजार क्षेत्रातील पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि मदत करण्याचे आश्वासनही दिले. मात्र, अद्यापही शेतकरी मदतीच्याच प्रतीक्षेत आहे.

हेही वाचा - पुढच्या वर्षी ऑगस्टमध्ये अमरावतीतून झेपावणार पहिले विमान; खासदार नवनीत राणांनी केली विमानतळाच्या कामाची पाहणी

सत्ता स्थापनेचा पेच सुटत नसल्याने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळून देण्याकरता आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. सत्ता स्थापनेचा घोळ थांबत नसल्याने कडू यांनी १४ नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी राज्यपालाच्या दालनात आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा - मुलाच्या लग्नानिमित्त दिली संपूर्ण गावाला मायेची ऊब; गावकऱ्यांशी जपले ऋणानुबंध

राज्यात नवीन येणारं सरकार यावर काय निर्णय घेते याकडे इथला शेतकरी लक्ष लावून बसला आहे. लागवडीसाठी लागलेला खर्चही निघणार नाही असे हे शेतकरी म्हणताहेत. डोळ्यासमोर असलेलं पीक वाया जात असल्याने आता प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडेच शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - अमरावती जिल्ह्यातील आष्टा शेतशिवारात अजगराने केली हरणाची शिकार, पाहा व्हिडिओ

Last Updated : Nov 14, 2019, 7:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details