अमरावती - शेतात काम करत असताना मुलाच्यासमोरच आईच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्याच्या उंबरखेड येथे दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
अमरावती : शेतकरी महिलेचा शेतात काम करताना वीज पडून मृत्यू - वीज पडून मृत्यू
अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील उंबरखेड येथे शेतात काम करताना अंगावर वीज पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नर्मदा जानराव मुंद्रे (वय 65 वर्षे, उंबरखेड) असे मृत महिलेचे नाव आहे. आज सकाळपासून ही महिला आपल्या मुला व पतीसह शेतात कांदा वेचणीचे काम करत होती. अचानक दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला. कांदा वेचत असताना जोरदार वीज कडाडली व महिलेचा तडफडून मृत्यू झाला. आईच्या अंगावर वीज पडली असल्याचे लक्षात येताच मुलगा व महिलेच्या पतीने घटनास्थळी धाव घेतली असता काही क्षणात तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती तिवसा पोलिसांना देण्यात आली असून तिवसा ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदन करण्यात आले.
हेही वाचा -नियमांचं पालन न करणाऱ्या १२०० वाहनचालकांवर कारवाई