महाराष्ट्र

maharashtra

अमरावती जिल्ह्यात पावसाची दडी; पिके जगवण्यासाठी भर पावसाळ्यात तुषार सिंचनचा वापर

By

Published : Jun 28, 2021, 12:29 PM IST

Updated : Jun 28, 2021, 12:56 PM IST

पश्चिम विदर्भात मुख्यतः कापूस, सोयाबीन, तूर ही पिके घेतली जातात. यासाठी हजारो हेक्‍टरवर शेतकर्‍यांनी पेरणी देखील केली. परंतु आठ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने मात्र, आता ती पिके कोमजायला सुरुवात झाली आहे.

पिके जगवण्यासाठी भर पावसाळ्यात तुषार सिंचनचा वापर
पिके जगवण्यासाठी भर पावसाळ्यात तुषार सिंचनचा वापर

अमरावती-हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी मान्सून विदर्भामध्ये वेळेवर दाखल झाला. दहा तारखेला मान्सून सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केलं. त्यानंतर शेतकऱ्यांनी लगबगीने आपल्या शेतात पेरणीही केली. परंतु मागील आठ दिवसांपासून पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे आता पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. परिणामी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पावसाळ्यात तुषार सिंचनाचा वापर करावा लागत आहे.

पिके जगवण्यासाठी भर पावसाळ्यात तुषार सिंचनचा वापर

समाधानकारक पाऊस नसल्याने पेरण्या रडल्या

पावसाळाला आला तरी उन्हाळ्यासारखे चित्र शेतांमध्ये दिसून येत आहे. हजारो रुपये खर्च करून शेतात पेरलेल्या बियाणे उगवले परंतु ते जगवण्यासाठी मात्र, आता शेतकरी तुषार सिंचनाचा वापर करत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. हवामान विभागाकडून राज्यात मान्सून सक्रिय झाल्याचे सांगण्यत येत आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी केली. पश्चिम विदर्भात मुख्यतः कापूस, सोयाबीन, तूर ही पिके घेतली जातात. यासाठी हजारो हेक्‍टरवर शेतकर्‍यांनी पेरणी देखील केली. परंतु आठ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने मात्र, आता ती पिके कोमजायला सुरुवात झाली आहे. अनेक भागात समाधानकारक पाऊस नसल्याने पेरण्याही मोठ्या प्रमाणावर रखडलेल्या आहे. यामुळे पेरणीचा वेळ निघून गेला तर उद्दीम कसा होईल, असा प्रश्न देखील शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे.

Last Updated : Jun 28, 2021, 12:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details