अमरावती -मोर्शी तालुक्यातील चिंचोली गवळी गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. गुणवंत किसन गजबे असे या शेतकऱ्याचे नाव असून शेतातील विहिरीतच उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली.
अमरावतीत कर्ज बाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या हे ही वाचा -अमरावती: मद्यधुंद अवस्थेत उपकोषागार अधिकाऱ्याचे आपल्याच कार्यालयात लोटांगण..
गुणवंत गजबे हे चिंचोली गवळी येथील रहिवासी असून धारूड शेत शिवारामध्ये त्यांची स्वतःची तीन एकर जमीन आहे . दुष्काळामध्ये संत्र्याची बाग वाळली आणि अतिवृष्टीने संपूर्ण पीक वाया गेल्याने गुणवंत हे बरेच दिवसापासून विवंचनेत होते. त्यांच्यावर असलेले बँकेचे कर्ज व गावातील खासगी देणे कसे द्यावे या विवंचनेतूनच त्यांनी आत्महत्या केली.
हे ही वाचा -अमरावतीच्या तिवस्यात भाजपा कार्यकर्त्यांचे 'चिखला'त बसून आंदोलन