अमरावती -बैलगाडीसह शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. यात त्याचा मृत्यू झाला. श्रावण लांजेवार असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
दुःखद! बैलगाडीसह शेतकरी गेला वाहून अमरावती जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरु आहे. बुधवारी (18 ऑगस्ट) दुपारी अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक परिसरातील नदी-नाले तुडूंब भरून वाहू लागले. यात विरुळ रोंघे येथील वयोवृद्ध शेतकरी श्रावण लांजेवार हे पाऊस सुरू असल्याने शेतातून घरी येत होते.
दोरखंड तुटल्याने बैल बचावले
तेव्हा विरुळ रोंघे रामगाव शिवारातील पाझर नाल्यातून बैलगाडी काढत असताना नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात बैलगाडीसह श्रावण वाहून गेले. दोरखंड तोडल्याने बैल बाहेर पडले. मात्र काही अंतरावर श्रावण यांचा मृतदेह गावकऱ्यांना दिसून आला. श्रावण यांच्या आकस्मित मृत्यूने विरुळ रोंघे गावात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा -आयुष्य खूप सुंदर आहे, पण माझ्या आयुष्यात त्रास आहे; फेसबुक पोस्ट करून छावा संघटनेच्या तालुकाध्यक्षाची एसटीखाली आत्महत्या