महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे उष्मघाताचा आणखी एक बळी - sun

धामणगाव तालुक्यात उष्माघाताने अजून  एक बळी गेला असून ही संख्या पाच झाली आहे. तर एका आठवड्यातील ही तिसरी घटना आहे.

धामणगाव रेल्वे रुग्णालय

By

Published : Jun 1, 2019, 8:55 PM IST

अमरावती- मागील दीड महिन्यापासून सुरू असलेल्या वाढत्या तापमानात उष्मघाताच्या रुग्णात वाढ झाली आहे. धामणगाव तालुक्यात उष्माघाताने अजून एक बळी गेला असून ही संख्या पाच झाली आहे. तर एका आठवड्यातील ही तिसरी घटना आहे.

धामणगाव तालुक्यात उष्माघाताने अजून एक बळी गेला असून ही संख्या पाच झाली आहे.

मधुकर विठोबा सहारे (वय ७०) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ते जळगाव आर्वी येथील रहिवासी आहेत. बुधवारी नातवाचे लग्न आटोपून आल्यानंतर त्यांना उन्हाचा झटका बसला. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सहारे यांना मृत घोषित केले

मागील दीड महिन्यापासून सूर्य आग ओकत असून शहरवासीयांप्रमाणे ग्रामस्थांनी आपले दैनंदिन जीवनाचे वेळापत्रक बदलले आहे. सकाळी दहा वाजे पासून उन्हाचे चटके बसत असल्याने नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details