अमरावती- जिल्हात १७ ऑक्टोबरपासून चालू असलेल्या अवकाळी पावसामुळे १.४५ लाख हेक्टरवरील खरिपाची पिके उध्वस्त झाली आहेत. असा जिल्हा कृषी विभागाचा अहवाल आहे. यात सर्वाधिक सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. शासनाच्या वतीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे सुरू आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन बाजारपेठेत विक्रीला नेले तेथे सुद्धा शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे.
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, खरीप उध्वस्त - शेतकरी नुकसान बातमी अमरावती
पावसाचं पाणी शेतात शिरल्याने सोयाबीन पीक पाण्यात भिजले आहे. त्यामुळे शेताला तलावाचे स्वरुप आले आहे. सोयाबीन हे पीक दिवाळीपूर्वी शेतातून घरी येते. मात्र, अवेळी पावसाने सोंगनीच्या वेळेस हजेरी लावल्याने सोयाबीन पार पाण्यात भिजले.
हेही वाचा-'भाजपला सरकार स्थापन करता आले नाही तर, पर्यायी सरकार स्थापन करू'
पावसाचं पाणी शेतात शिरल्याने सोयाबीन पीक पाण्यात भिजले आहे. त्यामुळे शेताला तलावाचे स्वरुप आले आहे. सोयाबीन हे पीक दिवाळीपूर्वी शेतातून घरी येते. मात्र, अवेळी पावसाने सोंगनीच्या वेळेस हजेरी लावल्याने सोयाबीन पार पाण्यात भिजले. त्यामुळे सोंगनी करुन ठेवलेल्या सोयाबीन पीक जागेवरच सडले. तर कपाशीचे बोंडही पार पावसाने सडली आहे. तसेच मूग, उडीद पीक सुद्धा उद्ध्वस्त झाली आहेत. जिल्ह्यातील १४ लाख ७ हजार ९१९ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. ही मागणी शेतकऱ्यासह राजकीय नेत्यांनी केली आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देऊन तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी ही मागणी करण्यात आली आहे.