अमरावती -मागील महिन्यात आलेल्या पावसामुळे सोयाबीन, कापसासह आदी पिकांनी निराशा केली, तर आता जोमदार बहरलेल्या तुरीवर ढगाळ वातावरणामुळे अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा महागड्या फवारणी कराव्या लागणार आहेत. आधीच डबघाईला आलेल्या शेतकऱ्यांना आणखी पुन्हा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
जिल्ह्यात सोयाबीन, कपाशीनंतर तूर हे प्रमुख खरीप पिके आहेत. शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ही या प्रमुख पिकांवर अवलंबून आहे. जिल्ह्यात 110012 हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. त्यातच यावर्षी परतीच्या पावसाने सोयाबीनची धूळधाण केली. त्याचा कापसाच्या पिकालाही जोरदा फटका बसला. त्यामुळे कपाशीचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात घटले. तसेच सोयाबीनला मातीमोल दर मिळाले.