महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पेरलेले उगवलेच नाही, संकटात सापडलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या - शेतकरी आत्महत्या अमरावती

एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत आहे. मात्र, कर्जासाठी बँकेच्या पायऱ्या झिजवल्या तरी कर्ज मिळत नाही. शेतकऱ्यांना खासगी सावकाराशिवाय पर्याय नाही. त्यात उत्पन्न कमी, नैसर्गिक संकट, भाव न मिळणे अशा अडचणी आहेत. त्यामुळे कर्ज फेडणे अशक्य होते.

farmer-committed-suicide-in-vasad-at-amravati
संकटात सापडलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

By

Published : Jun 25, 2020, 2:17 PM IST

अमरावती- सध्या पावसाळा सुरू झाला असून खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. अमरावती जिल्ह्यात ६१ टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. अशातच जिल्ह्यातील वसाड येथील अनिल गवई या शेतकऱ्याने बियाणे न उगवल्याने आत्महत्या केली आहे.

संकटात सापडलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या


जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील १ हजार ४०० लोकसंख्या असलेले वसाड गाव आहे. या गावातील शेती हा मुख्य व्यवसाय आहे. ऊन वारा पाऊस झेलत येथील शेतकरी शेती करतात. अनिल गवई यांच्याकडे सुद्धा ४ एकर शेती आहे. यावर्षी उसनवारी करून त्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र, पेरणी केलेले बियाणे काही भागात उगवलेच नाही. त्यामुळे केलेला खर्च वाया गेला आणि आता दुबार पेरणीसाठी परत खर्च करावा लागेल या चिंतेतून अनिल यांनी जीवन संपवले.

एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत आहे. मात्र, कर्जासाठी बँकेच्या पायऱ्या झिजवल्या तरी कर्ज मिळत नाही. शेतकऱ्यांना खासगी सावकाराशिवाय पर्याय नाही. त्यात उत्पन्न कमी, नैसर्गिक संकट, भाव न मिळणे अशा अडचणी आहेत. त्यामुळे कर्ज फेडणे अशक्य होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे.

व्यावसायिक बोगस बियाणे विकतात. याच धामणगाव तालुक्यातून २० लाखाहून अधिक बोगस बियाणे जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details