अमरावती : शेतात जाण्याचा वडिलोपार्जित रस्ता अडवल्यामुळे आणि महसूल प्रशासनाकडून कठलाही न्याय मिळत नसल्यामुळे त्रस्त शेतकऱ्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्रकरण अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तुरखेड येथे घडले. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव पांडुरंग काशीनाथ महल्ले (वय 62) असे आहे.
असे आहे प्रकरण : मृतक पांडुरंग काशीनाथ महल्ले यांचे वडिलोपार्जित शेत, चिंचोणा शेत शिवारात असून, या शेतात जाण्यासाठी रामराव शामराव वानखडे यांचे शेतातून रस्ता असल्याचे समजते. परंतु, एक वर्षापासून वानखडे यांनी शेतातून जाण्यास मज्जाव केल्याने मृतक महल्ले यांनी महसूल विभागाकडे रस्ता देण्याची मागणी केली होती. संबंधित प्रकरण गेल्या सहा महिन्यांपासून तहसील कार्यालय येथे सुरू होते. बुधवारी नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांनी शेतात जाऊन पाहणीसुद्धा केली होती. परंतु, न्याय मिळण्यास उशीर होत असल्याने आणि शेतात जाण्यासाठी दुसरा रस्ता नसल्याने पांडुरंग काशिनाथ महल्ले यांनी आज सकाळी ११ वाजताचे दरम्यान ज्याने शेतात जाण्यासाठीचा रस्ता अडवला त्याचे शेतातील झाडाला फाशी घेतली.
आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली चिठ्ठी : मृतकाने मृत्युपूर्व चिठ्ठी लिहून ठेवली असून, ज्यात देविदास तुळशीराम वानखडे, रामराव शामराव वानखडे आणि त्याचा मुलगा माझे आत्महत्येस दोषी असल्याचे चिठ्ठीत लिहले असल्याने मृतकाचे नातेवाइकांनी आरोपीस अटक होईपर्यंत शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने ग्रामीण रुग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
Farmer's suicide : शेतात जाण्यास रस्ता देत नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या - Farmer suicide
शेतकऱ्याने ज्या शेतात उभे आयुष्य खर्ची केले, त्या शेतात जाण्यास रस्ता देत नसल्याने शेतकऱ्याने गळफास लावून केली आत्महत्या. (Farmer commits suicide ) शेतात जाण्यासाठी परंपरागत एकच रस्ता आहे. शेतमालकाने रस्ता अडवून पीडित शेतकऱ्याची अडवणूक केली. ( Obstruction of farmers due to road blockage ) यालाच कंटाळून पीडित शेतकऱ्याने आत्महत्या केली.
शेतकऱ्याची आत्महत्त्या