अमरावती - सततच्या नापिकीमुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली आहे. सिद्धनाथपूर येथील ग्रामस्थांनी त्यांना मदत करावी या उद्देशाने शेतकऱ्याचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणून ठेवला होता. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यावर कर्जही असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा - 'बाजार समित्या बरखास्तीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या गळ्यात फास'
सुधाकर महादेवराव पाटेकर (वय-47) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 13 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता सुधाकर पाटेकर यांनी शेतात जाऊन विष पिऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. यावर्षी त्यांनी त्यांच्या तीन एकर शेतामध्ये सोयाबीन पेरली होती. पावसामुळे त्यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक पुर्णपणे वाया गेली. म्हणून जवळ पैसे नसल्याने मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न कसे करावे? अशा विवंचनेत सुधाकर पाटेकर होते.