अमरावती - राज्यात मागील महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती मागील आठवडाभरापासून पावसाने उसंत दिली असताना शनिवारी (दि. 16 ऑक्टोबर) जिल्ह्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतात काम करत असलेल्या युवा शेतमजुराचा वीज कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील आजणगाव शेतशिवारात घडली आहे. किरण थाळे (वय 24 वर्षे), असे मृत शेतमजुराचे नाव आहे. आज मंगेश लंबळी यांच्या शेतात सोयाबीन काढण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक पाऊस आल्याने त्याने सोयाबीन झाकण्यासाठी तो ताडपत्री आणत होता. त्याचवेळी अचानक वीज कोसळल्याने किरण गतप्राण झाला. अचानक झालेल्या किरणच्या या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या किरणचा मृतदेह धामणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला आहे.
अनेक शेतकऱ्यांचा कापूस झाला ओला