अमरावती-दर्यापूर तालुक्यातील सांगळूड येथे विनय गावडे या शेतकऱ्याच्या शेतात असलेले शेकडो एकर वरील शेततळे गेल्या गुरुवारी(दिनांक ८ ऑगस्ट) संततधार पावसामुळे अचानक फुटल्याची घटना घडली. यामुळे शेततळ्याच्या परिसरातील शेती जलमय झाली असून शेतात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, याच शेततळ्यात मत्स व्यवसाय केला जात होता. परंतु शेततळे फुटल्याने लाखो रुपयांच्या मासोळ्या या पाण्यात वाहून गेल्या. त्यामुळे विनय गावडे हे चिंताग्रस्त झाले आहेत. गावडे यांना प्रशासनाने मदत करावी, अशी मागणी होत आहे.
अमरावती: सांगळूड येथे शेततळे फुटून 200 एकर शेतात साचले पाणी, लाखो रुपयांच्या मासोळ्या गेल्या वाहून - शेतळ्यातील मासोळी
शेततळ्याच्या परिसरातील शेती जलमय झाली असून शेतात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच शेतळ्यातील मासोळी देखील पाण्यासोबत वाहून गेली आहे.
मागील काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या मशागती करिता कोणताही पर्याय मिळत नाही. तर तालुक्यातील सांगळूद येथे जलसंधारण विभागाने बांधलेल्या शेततळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून अखेर शेत तळ्याचे बांध फुटले आणइ संगळूद येथील सुमारे 200 एककर शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
एकीकडे पेरणी झाल्यावर सुमारे 1 महिना पावसाने दांडी मारली होती. तर मागील काही दिवसापांसून पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना आता चिंता पडली आहे. तर सांगलुद येथील युवा शेतकरी विनय गावडे यांनी काही उद्योग सुरू करावा, यासाठी शासनाची रक्कम भरून शेततळ्यामध्ये मस्त्य उत्पादन घेण्यासाठी लाखो रुपयाचे बियाणे टाकले होते. शेततळ्यात 500 ग्राम वजनाच्या मच्छी मोठया प्रमाणात जमा होत्या. परंतु तलावाच्या आउटलेट बांधातून सतत पाणी वाहत गेल्याने यामध्ये शेतकऱयाचे लाखो रुपयांच्या मच्छी वाहून गेली आहे. प्रशासनाने संबधित विषयावर पंचनामा करून तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.