महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना : आईच्या तेरवीच्या खर्चतून संपूर्ण गावाला मास्क व सॅनिटायझरचे वाटप

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपल्या आईची तेरवी न करता संपूर्ण गावाला या रोगाच्या संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी भातुकली तालुक्याच्या वासेवाडी गावातील भांबुरकर कुटुंबाने त्या पैशातून संपूर्ण गावाला मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले आहे.

By

Published : Apr 7, 2020, 2:46 PM IST

Updated : Apr 7, 2020, 3:23 PM IST

आईच्या तेरवीच्या खर्चतुन संपूर्ण गावाला वाटले मास्क व सॅनिटायझर
आईच्या तेरवीच्या खर्चतुन संपूर्ण गावाला वाटले मास्क व सॅनिटायझर

अमरावती -सध्या देशावर ओढवलेले कोरोनाचे सावट पसरले आहे. अशा परिस्थितीत आपल्या आईची तेरवी न करता संपूर्ण गावाला या रोगाच्या संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी भातुकली तालुक्याच्या वासेवाडी गावातील भांबुरकर कुटुंबाने त्या पैशातून संपूर्ण गावाला मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले आहे.

आईच्या तेरवीच्या खर्चतुन संपूर्ण गावाला वाटले मास्क व सॅनिटायझर

वासेवाडी गावातील 70 वर्षीय शकुंतला बाई भांबुरकर यांचे 25 मार्चला वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर कुटुंबियांनी अतिशय जवळच्या नातेवाईकांना बोलावून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. सध्या कोरोनामुळे देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली असल्याने तेरविचा कार्यक्रम सुद्धा करता येणे शक्य नव्हते. कदाचित लॉक डाऊन नसता तर तेरविचा कार्यक्रम करता आला असता. परंतु, त्या तेरवीच्या पैशातून भांबुरकर कुटुंबाने सामाजिक बांधिलकी जपत संपूर्ण वासेवाडी गावाला सुमारे 800 मास्क व 140 बॉटल सॅनिटायझरचे वाटप केले. भांबुरकर कुटुंबाने दु:खात असतानाही मदतीचा हात म्हणून गरजोपयोगी वस्तूंचे वाटप समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.

Last Updated : Apr 7, 2020, 3:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details