महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करा - यशोमती ठाकूर - womens day news

महिलांनी आव्हानांना घाबरून जाण्यापेक्षा आत्मविश्वासाने त्यांचा सामना करत त्यावर मात केली पाहिजे अशा शब्दांत महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करा - यशोमती ठाकूर
आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करा - यशोमती ठाकूर

By

Published : Mar 8, 2021, 8:38 AM IST

अमरावती : महिलांनी आव्हानांना घाबरून जाण्यापेक्षा आत्मविश्वासाने त्यांचा सामना करत त्यावर मात केली पाहिजे अशा शब्दांत महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येकात एक शक्ती असते. कुणीही दुर्बल नसतो असेही त्यांनी म्हटले आहे.

आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करा - यशोमती ठाकूर
‘चुझ टू चॅलेंज’ ही यंदा आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम आहे. त्यानिमित्त समस्त महिला भगिनींना शुभेच्छा देताना पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, प्रत्येकात निश्चित कुठलीतरी शक्ती असते. त्यामुळे अन्याय कधीही सहन करता कामा नये. आत्मविश्वासाने व खंबीरपणे त्याचा प्रतिकार केला पाहिजे. महिलाभगिनींनी सतत व्यक्त झाले पाहिजे. ‘तुम्ही जगाकडे पाठ करा, अख्खे जग तुमच्या पाठीशी राहील’ असे एक वचन आहे. त्यानुसार आत्मविश्वासाने व्यक्त झाले पाहिजे व अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details