अमरावती :प्राचीन काळात गुरूच्या आश्रमात शिष्य घडत होते. काळ बदलला व लोकं सुध्दा मात्र अमरावती शहरात शेगाव नाका परिसरात असणाऱ्या एशियाड कॉलनी येथे वैदिक काळातील गुरुकुल शिक्षण पद्धतीचा अनुभव आजही घ्यायला मिळतो. येथे ऋषीमुनी नसले तरी रामायण, महाभारतमधील दृष्टांत मुलांना ऐकायला मिळतो तेही निसर्गरम्य वडाच्या पारब्यांच्या सानिध्यात.
असा आहे हा उपक्रम :उन्हाळा लागला की शिबिरांचे पेव फुटते. कुठे आठ, कुठे दहा तर कुठे पंधरा दिवस चालणाऱ्या शिबिरात पालकांना हवे असलेले तसेच मुलांना एंगेज करणारे उपक्रम घेतले जाते. यासाठी पालकसुध्दा आपापल्या आर्थिक कुवतीनुसार शिबिराची निवड करतात. व्यावसायिक काळात सुध्दा कुठल्याही फळाची अपेक्षा न करता रजनी खानजोडे ह्या शिबिरामध्ये मुलांना रामायण, महाभारत ओंकारजप , ध्यान ,जप साधना, तसेच विविध धार्मिक व आधुनिक काळातील बाबींवर भर दिल्या जातो. गुरुकुल पद्धतीनुसार विविध यज्ञ, तसेच परिसरातून धान्य गोळा करून महाप्रसाद कार्यक्रम करून शिबिराचा समारोप केल्या जातो. भावी पिढीतील मुला- मुलींवर संस्कार व्हावे म्हणून सदर शिबिर घेत असल्याचे संयोजक रजनीताई खानजोडे यांनी सांगितले. त्यांच्या या कार्यात खाडे कुटुंबीय,देशमुख कुटुंबीय व परिसरातील इतरांचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजाचा सक्रिय सहभाग :शिबिरमधील मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त ईतर आवड निर्माण व्हावी, म्हणून येथे चित्रकला, पेन्सिल स्केच, रांगोळी,धावण्याची शर्यत, ईतर खेळ प्रकार, बाहुली नाट्य, शिवकालीन किल्ले निर्मिती, निसर्ग जनजागृती, पक्षी - प्राणी, जैव विविधता, आदी अभ्यासेत्तर विषयांवर भर दिला जातो. खानजोडे यांच्या या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी बाहुली नाट्य कलाकार दीपालीताई बाभूळकर, चित्रकार रांगोळी कलाकार उमेश उदापुरे, वन्यजीव अभ्यासक यादव तरटे, निसर्ग अभ्यासक श्रीनाथ वानखडे आदी मुलांना मार्गदर्शनाच्या स्वरूपात सहकार्य करत आहे.
- हेही वाचा -