अमरावती - चांदूर रेल्वे तालुक्यात युरियाचा काळाबाजार सुरू आहे. एका शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर चांडक कृषी केंद्रात आज कृषी एसडीओंच्या नेतृत्वात छापा टाकण्यता आला. यावेळी गोडाऊनमध्ये ८४ युरियाची पोती आढळून आली. संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाईची प्रक्रिया सुरू होती.
चांदूर रेल्वे तालुक्यात युरियाचा काळाबाजार; चांडक कृषी केंद्रावर कृषी एसडीओंच्या नेतृत्वात छापा
चांदूर रेल्वे तालुक्यात युरियाचा काळाबाजार सुरू आहे. एका शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर चांडक कृषी केंद्रात आज कृषी एसडीओंच्या नेतृत्वात छापा टाकण्यता आला. यावेळी गोडाऊनमध्ये ८४ युरियाची पोती आढळून आली. संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाईची प्रक्रिया सुरू होती.
चांदूर रेल्वे तालुक्यात युरियाचा काळाबाजार; चांडक कृषी केंद्रावर कृषी एसडीओंच्या नेतृत्वात छापा
साठा असतानाही शेतकऱ्यांना न दिल्यामुळे संबंधित कृषी केंद्रावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच याच चांडक कृषी केंद्रात रासायनिक खत बोर्ड अद्ययावत केलेले नाही. साठा रजिस्टर अपडेट केलेले नाही. खतांचा अहवाल देखील सादर केला नसल्याचे समोर आले आहे. याचप्रमाणे अन्य काही त्रुटी आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.