महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेळघाटात लुटता येणार झोबरी बॉलचा आनंद, हरीसाल निसर्ग संकुलात नवी सुविधा

निसर्गाचा आनंद लुटायचा असेल तर विदर्भाच नंदनवन हा उत्तम पर्याय आहे. अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेत चार हजार फूट उंच पर्वतात हिरवाईने नटलेला मेळघाट परिसर पर्यटकांना भुरळ घालतो आहे. या ठिकाणी आमझरी येथे एडवेंचर स्पोर्ट सोबत हत्ती सफारी आणि आणि आता झोबरी बॉलने भर घातली आहे.

मेळघाटात लुटता येणार झोबरी बॉल
मेळघाटात लुटता येणार झोबरी बॉल

By

Published : Jan 17, 2021, 2:56 PM IST

अमरावती - निसर्गाचा आनंद लुटायचा असेल तर विदर्भाच नंदनवन हा उत्तम पर्याय आहे. अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेत चार हजार फूट उंच पर्वतात हिरवाईने नटलेला मेळघाट परिसर पर्यटकांना भुरळ घालतो आहे. या ठिकाणी आमझरी येथे एडवेंचर स्पोर्ट सोबत हत्ती सफारी आणि आणि आता झोबरी बॉलने भर घातली आहे.

मेळघाटात लुटता येणार झोबरी बॉलचा आनंद
डिजिटल ग्रामच्या नावाने देशभरात प्रसिद्ध असलेल्या हरिसाल येथे आता नव्याने झोबरी बॉल सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. नदीमधील नौका विहार आणि आदिवासी संस्कृती पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी दाखल होतात. मात्र गुगामल विभागाने यात आणखी झोबरी बॉलची भर घातली आहे. सिपणा नदीपात्रात हा बॉल ठेवण्यात आला आहे. पाण्यावर तरंगणारा झोबरी बॉल पर्यटकांना अक्षरशः आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्यामुळे झोरबी बॉलमध्ये बसून पाण्यावर तरंगण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक हरिसाल येथे गर्दी करत आहेत.सध्या नवीन वर्षाचा पहिला महिना सुरू असल्याने आणि त्यात कडाक्याची थंडी असल्याने अनेक पर्यटक आता मेळघाटामध्ये दाखल झाले आहे. मेळघाटाच्या चिखलदरामध्ये पॉईंटवर असलेला तलाव त्यानंतर जंगल सफारी याला पर्यटक मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत असतानाच आता झोबरी बॉल हा सुरु झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details