अमरावती -राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे सुसूत्रीकरण करावे, तसेच 2018 पासून थकीत असलेली वेतन तफावत मिळावी, यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांसह भीम ब्रिगेडच्या वतीने शहरात आंदोलन करण्यात आले. दरम्यान यावेळी आंदोलकांनी आयुक्तांना भेटण्याची मागणी केली. यावर 10 जणांनाच भेटता येईल असं आयुक्तांनी या आंदोलकांना सांगितले, मात्र सर्वांसमोर आयुक्तांनी बोलावे अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली.
पोलिसांचा बंदोबस्त
दरम्यान यावेळी आंदोलकांनी महापालिकेत गोंधळ घातला, गोंधळ वाढल्याने घटनास्थळी पोलिसांना बोलवण्यात आले. आंदोलकांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात चूल पेटवण्याचा प्रयत्न केल्याने, सुरक्षा रक्षक आणि आंदोलकांमध्ये वाद वाढला, अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी महापालिकेत आंदोलन कर्मचाऱ्यांची भूमिका योग्य नाही - आयुक्त
मी 10 जणांना भेटण्यास बोलवले होते, मात्र आंदोलकांनी सगळ्यांना भेटण्याची मागणी केली, वेतन सुसूत्रीकरणाचे काम सूरू आहे. येत्या 8 दिवसांत कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील, आजची कर्मचाऱ्यांची भूमिका योग्य नसल्याची प्रतिक्रिया या आंदोलनावर महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली आहे.