अमरावती -भर उन्हात डीपी भडकल्याने बोराळ्यात भीषण आग लागल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी २ वाजता घडली. अचानक आगीचा भड़का उडाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे जीवित व वित्तहानी टळली. अनेकांनी पाण्याच्या बादल्या आणि पोहऱ्यात पाणी घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. याबाबत वीज वितरण कंपनीकडे तक्रार करून ही दखल न घेतल्याने अभियंत्याविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संताप होता.
बादल्याने पाणी टाकून आगीवर नियंत्रण -
दर्यापूर तालुक्यातील बोराळा (आराळा) येथे आज दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक डीपीमधून आगीचे गोळे बाहेर पडायला सुरुवात झाली. काही कळायच्या आतच आगीचा भड़का उडाला होता. डीपीच्या बाजूला इंधनासाठी सुकलेल्या पराट्या टाकलेल्या असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी डीपीच्या दिशेने धाव घेतली. तातडीने प्रत्येक व्यक्ती पाण्याच्या बादल्या, गुंड आणि पोहऱ्यातील पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळविले.