महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्रामपंचायत रणधुमाळी : ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी - अमरावती ग्रामपंचायत निवडणूक २०२०

ग्रामंपचायत निवडणुका जाहीर झाल्यानंर ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, तेथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामध्ये पॅनल उभा करण्यासाठी आणि उमेदवार निवडीसाठी पुढारी मंडळीचा ग्रामपंचायती कडे राबता वाढलेला आहे. १५ जानेवारीला ग्रामंपचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

Election
निवडणूक

By

Published : Dec 24, 2020, 12:40 PM IST

अमरावती - सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. कालपासून (२३ डिसेंबर) जिल्ह्यात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० डिसेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज दाखल करण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने त्यासाठी गर्दी होत आहे.

अर्ज दाखल करण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने त्यासाठी गर्दी होत आहे

येत्या १५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यासाठी गावखेड्यात भाऊ गर्दी होत आहे. उमेदवारी दाखल करताना उमेदवाराला नवीन बँक खाते काढायचे आहे. मात्र, बँक खाते काढणे उमेदवारांसाठी डोकेदुखी होत असल्याचे दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतीच्या १ हजार ५८३ प्रभागातून ४ हजार ८१६ सदस्य निवडायचे आहेत. त्यासाठी आगामी १५ जानेवारी रोजी निवडणूक पार पडत आहे. मतदानानंतर तीन दिवसांनी म्हणजेच १८ जानेवारीला या निवडणुकीचा निकाल घोषित होईल. दरम्यान, शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांनी अमरावती दौरा केला. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी त्यांनी कार्यकर्त्यांचा आढावा घेऊन मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम -

डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देश पत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. या अर्जांची छाननी 31 डिसेंबरला होईल. 4 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 15 जानेवारीला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 18 जानेवारीला मतमोजणी होईल. विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details