अमरावती -रविवारला धारणी शहरासह तालुक्यातील लगतच्या गावातील आठ नागरिकांना लांडग्याने चावा घेऊन जखमी केले आहे. जखमींवर धारणी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार पार पडले असून त्यांना उपचाराकरिता वनविभागाने अमरावती येथील जिल्हा समान्य रुग्णालयात हलविले आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या 15 दिवसातली ही दुसरी घटना आहे.
नेमकं काय घडलं? -
रविवारी लांडग्याने शौचास जाणाऱ्या व शेतात काम करण्याऱ्या आठ नागरिकांना चावा घेऊन जखमी केले आहे. त्यामध्ये धारणी शहरातील वॉर्ड क्र 5 येथील आठ वर्षीय चिमुकला अयाण उल्हा हा सकाळी शहरालगत असलेल्या मधवा नाल्या शेजारी सौचास गेला असता तो सौचास बसला असताना पाहून लांडग्याने त्याच्यावर अचानक झडप घातली. त्याला जखमी केले त्याच्या सोबत त्याचा मित्र असल्याने त्याने आरडा ओरड करून त्याचा जीव वाचवला. त्याच्या घरच्यांना माहिती दिली. त्यांनी आयण ला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णलयात दाखल केले तेथे त्याच्यावर प्रथमिक उपचार झाल्यानंतर त्याला अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचाराकरिता आणले आहे. त्यासह धारणी शहरातील आवेज खान मोबिन खान (32), शेजारच्या मांडवा गावातील सचिन सुरेश भिलावेकर (17), बापूराव जावरकर (29), सानू ओंकार कासदेकर (65) टेम्बली गावातील अभिजित श्यामलाल भिलावेकर, राणितंबोली येथील पिंगलाबाई रामकीसन भारवे (64), प्रेमलाल काल्या मोरेकर (25) अशा आठ जणांना चावा घेऊन जखमी केले.
यापूर्वीही घडली होती घटना -
प्रादेशिक वनविभाग परतवाडा अंतर्गत येणाऱ्या धारणी वनपरिक्षेत्राची सीमा ग्रामीण भागासह शहरालगत असून सध्यास्तीतीत जगलांतील वन्यप्राण्यांनी गावकडे धाव घेणे सुरू केले आहे. गावालगत व नदी नाल्या लगत असलेल्या शेतात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार होत आहे. मागील पंधरा दिवसांत आधी एका कोल्ह्याने 20 नागरिकांना चावा घेऊन जखमी केले होते. त्यापैकी एका वृद्धाचा मृत्यू सुद्धा झाला होता. त्या कोल्ह्याला नागरिकांनी ठार केल्यानंतर त्याची दहशत संपली असता पुन्हा तालुक्यात लांडग्याची दहशत सुरू पसरली.