महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत 33 वर्षांपासून राष्ट्रीय एकतेच्या प्रतिका स्वरुपात साजरी होते रमजान ईद

रमजान इच्छा पर्वावर पठाण चौक परिसरात लगत असणाऱ्या ईदगाह येथे शहरातील हजारो मुस्लिम भाविकांनी सकाळी आठ ते नऊ वाजले दरम्यान नमाज पठण केले. नमाज पठणाच्या निमित्ताने ईदगाह परिसरात गजबजून गेला होता.

रमजान ईद
रमजान ईद

By

Published : May 3, 2022, 12:43 PM IST

अमरावती -रमजान इच्छा पर्वावर अमरावती शहरातील पठाण चौकात पोलीस आयुक्तालय अमरावती व राष्ट्रीय एकता मंचच्या वतीने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असणाऱ्या कार्यक्रमाअंतर्गत हाच सोहळा आयोजित करण्यात येतो. राष्ट्रीय एकतेचे प्रतीक असणारा हा सोहळा 33 वर्षांपासून अमरावतीत होत आहे.

अमरावतीत 33 वर्षांपासून राष्ट्रीय एकतेच्या प्रतिका स्वरुपात साजरी होते रमजान ईद

हजारो मुस्लिम बांधवांनी केले नमाज पठाण -रमजान इच्छा पर्वावर पठाण चौक परिसरात लगत असणाऱ्या ईदगाह येथे शहरातील हजारो मुस्लिम भाविकांनी सकाळी आठ ते नऊ वाजले दरम्यान नमाज पठण केले. नमाज पठणाच्या निमित्ताने ईदगाह परिसरात गजबजून गेला होता. पठाण चौक परिसरात पोलीस आयुक्तालय व राष्ट्रीय मंचच्या वतीने आयोजित ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या कार्यक्रमाला अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यासह अमरावती शहराच्या आमदार सुलभा खोडके. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते डॉ. सुनील देशमुख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके. माजी महापौर विलास इंगोले मिलिंद चिमोटे शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत या सोहळ्यात प्रामुख्याने उपस्थित होते.

राखावा सर्व धर्माचा आदर -अमरावती शहराची परंपराही सर्वधर्मसमभावाची आहे. रमझान ईदच्या परवा वर शहरातील सर्व दरम्यान नागरिकांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा द्याव्या असे आवाहन यावेळी डॉक्टर सुनील देशमुख यांनी केले. रमजान इच्छा प्रवाहवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील चित्रा चौक पठाण चौक गांधी चौक परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. दंगा नियंत्रण पथकही चित्रा चौक परिसरात तनात करण्यात आले आहे.

हेही वाचा -Eid-Ul-Fitr : अमन और शांती दे! प्रसिद्ध जामा मशिदीत सामुहिक नमाज पठन

ABOUT THE AUTHOR

...view details