अमरावती -मेळघाट हिरवाईने नटलेला प्रदेश आहे. याच मेळघाटमध्ये उन्हाळ्यात मात्र अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. शासनाच्या पाणीपुरवठा योजनेच पाणी कुठे मुरतं, असा सवाल देखील आदिवासी उपस्थित करत असतात. याच मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या अचलपुर तालुक्यातील वझ्झर गावात भर पावसाळ्यात पाणी प्रश्न पेटले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे या गावातील लोकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. गावातील पाइपलाइन लिकेज असल्याने येथील नळाना दूषित पाणी येते. त्यामुळे नागरिकांवर जनावरांच्या पिण्याच्या टाक्यातील नळावरून पाणी भरण्याची वेळ आली आहे. दरम्यान या विरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांचा आवाजच ग्रामपंचायत प्रशासनाकडून दाबला जात असल्याचे गावातील महिलांनी सांगितले आहे.
नळाला येणारा पाणीही दूषित आहे. त्यामुळे ते पिण्यायोग्य नाही. या पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे येथील नागरिक जनावरांसाठी लावण्यात आलेल्या टाक्यातील नळावरून पाणी नेतात. त्या नाल्याचे पाणी शुद्ध येत असल्यामुळे तिथूनच आम्ही पाणी भरत असल्याचे येथील महिलांनी सांगितले आहे.
सकाळपासूनच लागतात नळावर रांगा