अमरावती- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणारी महाविद्यालयीन हिवाळी परीक्षा गुरुवार पासून सुरू होणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक आले असून विद्यार्थ्यांना अद्यापही ओळखपत्र मिळाले नसल्याने विद्यार्थी चिंतेत पडले आहेत.
अमरावती विद्यापीठातील २१ महाविद्यालयांचा भोंगळ कारभार..विद्यार्थ्यांना अद्याप मिळाली नाहीत ओळखपत्रे
जवळपास सर्वच महाविद्यालयाचे ओळखपत्र पाठवले आहे. मात्र २१ महाविद्यालयाच्या हलगर्जीपनामुळे ओळखपत्र वाटण्यात उशीर झाल्याचे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ प्रमुख प्रा.डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले आहे.
दरम्यान, जवळपास सर्वच महाविद्यालयाचे ओळखपत्र पाठवले आहे. मात्र २१ महाविद्यालयाच्या हलगर्जीपनामुळे ओळखपत्र वाटण्यात उशीर झाल्याचे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ प्रमुख प्रा.डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले आहे. सध्या हिवाळी परीक्षा गुरुवार पासून सुरू होणार आहे. त्यासाठी ८ दिवसापूर्वीच परीक्षेचे ओळखपत्र विद्यार्थ्यांना पोहोचने अपेक्षित असते. परंतु, यावर्षी उशीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्ही परीक्षेचा अभ्यास करावा की ओळख पत्रासाठी महाविद्यालयात चकरा माराव्यात, असा प्रश विद्यार्थी उपस्थित करत आहे.
हेही वाचा-तिवसा नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची लटकवली झाडाला