अमरावती - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने 6 जानेवारीपासून ऑफलाईन शाळा बंद (Due to corona school is online again) केल्या आहेत. मेळघाटात इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या भुलोरी या गावात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत असणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना कोरोना नियमांतर्गत चावडीवर बोलावून त्यांचा अभ्यास घेण्याचा (Bhulori village of Melghat school start in Chawdi) निर्णय मुख्याध्यापकांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे विद्यार्थी आणि पालकांनी स्वागत केले आहे.
शाळेत केवळ 93 विद्यार्थी -
चिखलदरा तालुक्यात येणार्या भूलोरी गावात जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळा आहे. या शाळेत एकूण 93 विद्यार्थी असून पहिल्या वर्गात 13 विद्यार्थी, दुसऱ्या वर्गात 8 विद्यार्थी, तिसऱ्या वर्गात 9 विद्यार्थी, चौथ्या वर्गात 10 विद्यार्थी, पाचव्या वर्गात 9 विद्यार्थी, सहाव्या वर्गात 19 विद्यार्थी, सातव्या वर्गात 13 विद्यार्थी आणि इयत्ता आठवी अकरा विद्यार्थी आहेत.
हे ही वाचा -Corona Update : भारतात कोरोना रुग्णांमधे घट, 1.68 लाख नवीन रुग्णांची नोंद
कोरोना नियमांचे राखले जाणार भान -
कोरोना नियमांचे भान राखूनच विद्यार्थ्यांना शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. थर्मल मीटरद्वारे विद्यार्थ्यांचे तापमान दररोज तपासण्यात येणार आहे. ऑक्सी मीटरद्वारे विद्यार्थ्यांचे ऑक्सिजन प्रमाणही मोजले जाणार असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र भुरुंबे यांनी 'ईटीवी भारत 'शी बोलताना दिली