अमरावती - सध्या देशात कोरोना लसीचा ड्रायरन सुरु आहे.आज अमरावती जिल्ह्यात देखील ही प्रक्रिया सकाळी 8 ते 11 वाजे दरम्यान पार पडली आहे. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात अंजनगाव बारी व तिवसा येथील शासकीय रुग्णालयात ही रंगीत तालीम पार पडली.
अमरावती महानगरपालिका क्षेत्रात जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग स्कूल कॅम्पस व डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, तसेच ग्रामीण भागातील तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय व अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ड्राय रन प्रक्रिया पार पडली. अमरावती जिल्ह्यातील 100 आरोग्य कर्मचाऱ्यांनी ड्राय रनमध्ये सहभाग नोंदवला. कोरोना लस उपलब्ध जरी झाली नसली तरी कोरोना लस आल्यानंतर ही लस कशा प्रकारे देण्यात येणार आहे, त्याची रंगीत तालीम यशस्वी रित्या पार पडली.