महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'अंबा एक्सप्रेस'मध्ये तळीरामांसोबत रेल्वे कर्मचाऱ्यांची रंगली दारू पार्टी - अकोला रेल्वे स्थानक

अंबा एक्सप्रेस मधील वातानुकूलीत डब्यात वाढदिवसाच्या निमित्ताने तळीरामांच्या रंगलेल्या दारू पार्टीत दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

'अंबा एक्सप्रेस'मध्ये तळीरामांसोबत रेल्वे कर्मचाऱ्यांची रंगली दारू पार्टी

By

Published : Sep 26, 2019, 11:00 AM IST

Updated : Sep 26, 2019, 2:02 PM IST

अमरावती- अंबा एक्सप्रेस मधील वातानुकूलीत डब्यात वाढदिवसाच्या निमित्ताने तळीरामांच्या रंगलेल्या दारू पार्टीत दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात भीम बिग्रेडचे संस्थापक

अध्यक्ष राजेश वानखडे यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली आहे. दारू पार्टी करणाऱ्यांसोबतच रेल्वे कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अमरावती वरून मुंबईकडे जाणाऱ्या अंबा एक्सप्रेसमध्ये 16 तारखेला हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले.

अंबा एक्सप्रेस मध्ये मद्यपान करुन गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भीम बिग्रेडच्या राजेश वानखडे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

अकोला येथे रेल्वे स्थानकावर हे दारू पिणारे तळीराम बसले होते. यानंतर स्थानकावरील दोन रेल्वे कर्मचारी त्यांना सामील झाले. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी असताना देखील शेगाव स्थानकादरम्यान धुम्रमान केल्याचे निदर्शनास आले आहे.

हेही वाचा नाशिक जिल्ह्यात गावठी दारूचे अड्डे उद्धवस्त, आचारसंहितेच्या काळात पोलिसांची धडक कारवाई

त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन गोंधळ घालणाऱ्या या तळीरामांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भीम बिग्रेडचे संस्थापक राजेश वानखडे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

Last Updated : Sep 26, 2019, 2:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details