अमरावती : मेळघाटात ( Melghat In Amaravati District ) पाण्याचा दुष्काळ ( Drought In Melghat ) असून, धारणी तालुक्यात ( Dharni Tahsil Amaravati ) येणाऱ्या राणी गाव या गावात लगतच्या परिसरात कोरड्या विहिरीत सोडले जाणारे पाणी काढण्यासाठीही ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते आहे.
जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाई : मेळघाटात डिसेंबर जानेवारी महिन्यापासूनच अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होते .धारणी येथून 35 किमीच्या अंतरावर असलेले राणीगाव येथे जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाई निर्माण झाली आहे . 2100 लोकसंख्या असणाऱ्या या गावात आता उन्हाळ्यात तर गावकऱ्यांना पाण्यासाठी अतिशय कष्ट घ्यावे लागत आहे. गावात दोन विहीर असून या दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत.
चार किलोमीटर अंतरावरून गावात आणले जात आहे पाणी :राणी गाव येथे 7 वर्षाआधी 11 किमी अंतरावर असणाऱ्या गोलाई या गावातून पाणी आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आता 4 किमी अंतरावर असणाऱ्या कंजोली या गावारून पाईपलाईच्या माध्यमातून पाणी आणून येथील विहिरीत सोडले जाते.
ग्रामस्थ दिवसभर भरतात पाणी :गावातील ग्रामस्थ मिळेल तेव्हा पाणी भरत असतात. दिवसरात्र येथील नागरिक सध्या विहिरीच्या फेऱ्या मारत आहेत. इथे दोन ठिकाणी बोरवेल खोदण्यात आल्या. मात्र, त्या सुद्धा कोरड्याच निघाल्या. गावात नळयोजना आहे पण, पाण्याची सोय नसल्याने ती सुद्धा बंद पडून आहे. भूजल पातळी वाढावी म्हणून गावानजीक तलाव तयार करण्यात आले. परंतु त्याचा सुद्धा काहीही उपयोग झाले नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.