अमरावती- देशभरात सध्या तिसऱ्या टप्यातील लसीकरण सुरू आहे. पण, या लसीकरणादरम्यान प्रचंड गर्दी होताना तुम्ही पाहली असेल. पण, आता अमरावतीच्या अचलपूर शहराने या गर्दीपासून आणि रांगेपासून मुक्तता मिळवली आहे. लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी येथील अधिकाऱ्यांनी एक शक्कल लढवली आहे. यामुळे गर्दी नियंत्रणात आली आहे.
लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी डॉक्टरांनी सुरू केली 'ड्रॉप बॉक्स' प्रणाली - अमरावती शहर बातमी
लसीकरणासाठी नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेंद्र ढोले यांनी नवी शक्कल लढवली आहे. रुग्णालयाबाहेर लागणाऱ्या रांगा व होणारी गर्दी टाळण्यासाठी त्यांनी टोकन प्रणाली सुरू केली आहे. यामुळे गर्दी नियंत्रणात आली आहे.
एका दिवसाला सुमारे 500 ते 600 नागरिकांनी या डब्यांमध्ये टोकन टाकतात. त्याची रितसर नोंद करत त्या नागरिकांना लस उपलब्ध झाल्यास फोनवरून लसीकरणासाठी बोलावले जाणार आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी होणारी गर्दी नगण्य झाली असून, नागरिकांनाही लस घेणे अत्यंत सुविधाजनक झाले आहे. उपजिल्हा रुग्णालयात पहिली लस व दुसरी लस अशा पद्धतीचे डबे तयार करण्यात आले असून त्या डब्यात माहिती लिहीलेली चिठ्ठी संकलीत केले जाते. तशी नोंद घेऊन लसीकरणाची व्यवस्था करण्याचा हा प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरला आहे. राज्यभरातील लसीकरण केंद्राना दिशा देणारा आहे.
हेही वाचा -वरुड तालुक्यातील आयपीएल जुगार अड्ड्यावर छापा ; 7 जणांना अटक