महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती शहरातील कोरोना हॉटस्पॉटवर ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर - Drone cameras

अमरावती शहरात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. शहरातील हैदरपुरा, हाथीपुरा, नालसाबपुरा, बाबा चौक, नूराणी चौक, तारखेडा, पाटीपुरा, पठाण चौक, लालखडी परिसर, खोलापुरी गेट हे क्षेत्र कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषीत करण्यात आले आहे. वारंवार सांगूनही लोक घराबाहेर निघत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली असून सील केलेल्या भागावर आता तीन ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

Drone cameras
ड्रोन कॅमेरा

By

Published : Apr 28, 2020, 9:48 AM IST

अमरावती -शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. आत्तापर्यंत २३ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. ज्या भागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत तो परिसर सील करूनसुद्धा लोक रस्त्यावर येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली असून सील केलेल्या भागावर आता तीन ड्रोन कॅमेरऱ्यांची नजर राहणार आहे. कोणीही संचारबंदीचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.

शहरातील हॉटस्पॉटवर ड्रोन कॅमेरांची करडी नजर

अमरावती शहरात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. शहरातील हैदरपुरा, हाथीपुरा, नालसाबपुरा, बाबा चौक, नूराणी चौक, तारखेडा, पाटीपुरा, पठाण चौक, लालखडी परिसर, खोलापुरी गेट हे क्षेत्र कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहे. वारंवार सांगूनही लोक घराबाहेर निघत असल्याने या भागात एसआरपीचे जवान तैनात करण्यात आले आहेत. शहरातील इतर काही भागांच्या सीमा सील करण्यात आल्या असून या भागावर ड्रोन कॅमेराची नजर असणार आहे. या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्निल उमप यांनी.

ABOUT THE AUTHOR

...view details