अमरावती - गेल्या एक महिन्यापासून कोरोनाचे संकट आल्यामुळे अनेक हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांचे रोजगार गेले आहेत. सुरुवातीला 21 दिवस संचारबंदीतून गेल्यानंतर दुसऱ्या संचारबंदीचा अनेक कामगारांना फटका बसला आहे. अशातच हाताला काम नसल्यामुळे जिल्ह्यातील येवदा येथील विवाहित ट्रक चालकाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे.
हाताला काम नाही; रोजगार हिरावल्याने तरुणाची आत्महत्या - अमरावती पोलीस
सुरुवातीला 21 दिवस संचारबंदीतून गेल्यानंतर दुसऱ्या संचारबंदीचा अनेक कामगारांना फटका बसला आहे. अशातच हाताला काम नसल्यामुळे जिल्ह्यातील येवदा येथील विवाहित ट्रक चालकाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे.

वैभव रवींद्र गणगणे
28 वर्षीय तरुण वैभव रवींद्र गणगणे याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. कामधंदा बंद असल्यामुळे या तरुणाला आपले वैवाहिक कसे जगावे? असा प्रश्न पडला होता. त्यानंतर त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. या त्याच्या मागे पत्नी आणि तीन वर्षाची मुलगी आहे.