महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bank Election: डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध होणार - भारताचे पहिले कृषिमंत्री

भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांनी स्थापित केलेल्या श्री शिवाजी शिक्षण द्वारा संचलित असलेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख अर्बन कॉपरेटिव बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे.

Bank Election
Bank Election

By

Published : Nov 29, 2022, 5:25 PM IST

अमरावती:भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांनी स्थापित केलेल्या श्री शिवाजी शिक्षणद्वारा संचलित असलेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख अर्बन कॉपरेटिव बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे.

राजकारणाचा गंध न देता केवळ सभासद:शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने बँक असल्याने त्यांचा सन्मान व्हावा. त्यासाठी बँकेच्या निवडणुकीला राजकारणाचा गंध न देता केवळ सभासद व ग्राहकांची हित लक्षात घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार क्षेत्रातील त्या मंडळींनी पुढाकार घेतल्याचे समजते आहे.

आतापर्यंत 11 उमेदवारांनी घेतली माघार:बँकेच्या 17 संचालक पदांसाठी 11 डिसेंबरला होऊ घातलेल्या निवडणुकीत अनेक इच्छुकांनी नामांकन दाखल केले आहे. अशातच काल 28 नंबर रोजी १३ उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतली. यामध्ये प्रफुल राऊत, गिरीश, भारसाकडे, दिलीपराव कोकाटे, संजय कोल्हे, विलासराव हरणे, विनायकराव गावंडे, सुरेंद्र कडू , संजय देशमुख, प्रकाश घाटे, साधना गणेशपुरे, हेमलता चौधरी यांचा समावेश आहे.

ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी पुढाकार: निवडणूक म्हटले की, त्यासाठी खर्च येणारच. आणि या निवडणुकीसाठी साधारनतः सुमारे 1 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा खर्च टाळण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मंडळी तसेच शिव परिवारातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी हा पुढाकार घेतला आहे. सहकार क्षेत्रातल्या नेत्यांनी घेतलेले या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details