कार्यक्रमाविषयी माहिती देताना हिंदू महासभेचे पदाधिकारी अमरावती : हैदराबाद येथील महावीर मिशन ट्रस्टचे संस्थापक प्रख्यात गोरक्षक निलेशचंद्रजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम आयोजित केला आहे. डॉ. प्रवीण तोगडिया यांच्या सभेची जय्यत तयारी येथील हिंदू धर्मसभेने चालवली आहे. त्यांचे दिवसभर शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजन समितीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या दरम्यान शहरातील एका बालाजी मंदिराचा शिलान्यास डॉ. तोगडिया यांच्या हस्ते होणार होणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली. सकाळी त्यांचे अमरावती शहरात आगमन होणार आहे. यानंतर दिवसभर त्यांच्या कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. दुपारी तीन वाजता च्या सुमारास ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील.
राम मंदिराला धोका? दुसरीकडे नागपुरात आज तोगडिया यांनी राम मंदिराबाबत वक्तव्य केले आहे. जर लोकसंख्येचे संतुलन झाले नाही तर आगामी 50 वर्षात राममंदिराला धोका असल्याचा इशारा तोगडिया यांनी दिला आहे. नागपुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी याबाबतचे विधान केल्यामुळे उद्या अमरावतीमध्ये काय बोलणार याची उत्सुकता आहे.
धर्मसभेचे आयोजन मोठा पोलीस बंदोबस्त :तोगडिया यांच्या अलीकडच्या वादग्रस्त वक्तव्याच्या कारणावरून पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. एखादी अप्रिय घटना घडू नये यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याला तशा सूचना देण्यात आल्याचे समजते. शहरातील संतोषी नगर भागातील दहा एकराच्या विस्तीर्ण परिसरामध्ये विशाल धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शहरातील हिंदू धर्मसभेची मंडळी तसेच इतर नागरिकही उपस्थिती लावणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. या विशाल हिंदू धर्मसभेला डॉ. प्रवीण तोगडिया संबोधित करणार आहेत.
ज्वलंत विषयांवर करणार भाष्य :केंद्र सरकारकडून लव्ह जिहाद, गोहत्या, लोकसंख्या नियंत्रण यावर कायदे करण्यासोबतच शिक्षण, रोजगार, धर्म या विषयांवर डॉ. प्रवीण तोगडिया यांचे मार्गदर्शन होणार आहे. याशिवाय शहरातील हिंदुत्वाच्या ज्वलंत समस्येवरही ते आपले विचार मांडणार आहेत. गेल्या काही वर्षांत तोगडिया यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विविध भागात अशा प्रकारचे धर्मसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख समिती म्हणून हिंदू धर्मसभा समितीचे अध्यक्ष महेश साहू, विकी माटोळे, प्रवीण गिरी, विकी अहारे, अभिषेक दीक्षित, पवन श्रीवास, राहुल मातोडे, आकाश ठाकूर, बिपीन गुप्ता आदी प्रयत्नशील आहेत.
आयोजकांचे आवाहन :आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल, अमरावती जिल्हा व शहर कार्यकारिणीही यावेळी स्थापन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सर्व धर्मप्रेमी बंधू, माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्माचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा :Most Expensive Flats Sell In Mumbai: मुंबईतील 23 सदनिकांचा झाला बाराशे कोटी रुपयांना सौदा; सर्वांत महागड्या सदनिकांचा मान