अमरावती:कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू हे पद रिक्त झाले होते. त्या पदाचा प्रभार डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे आज सोपवण्यात देण्यात आला आहे. डॉ. प्रमोद येवले यांची शैक्षणिक पात्रता एम.फार्म, पीएच.डी. व डी.बी.एम. असून सध्या ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत.
आदी पदे भूषविली: प्रमोद येवले यांनी फार्मसी कॉऊन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष, ऑल इंडिया कॉऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन फार्मास्युटिकल एज्युकेशन बोर्डाचे अध्यक्ष, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्लीच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, वर्धा कोर्टचे सदस्य, फार्मसी कॉऊन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्लीचे सदस्य, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, रायबरेली, यु.पी. च्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे सदस्य तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, नागपूरचे प्रभारी कुलगुरू आदी पदे भूषविली आहेत.
अनेक पुरस्काराने सन्मानित: त्यांना संशोधन आणि अध्यापनाचा 33 वर्षांचा अनुभव आहे. त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना वीस वर्षाचा प्रशासकीय अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणवीस संशोधकांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची चार पेटेन्ट फाईल झाली होती, त्यापैकी तीन पेटेन्टला मान्यता मिळाली आहे. त्यांचे अनेक संशोधन पेपर प्रकाशित झाले. अनेक प्रोजेक्टसवर त्यांनी काम केले आहे. आठ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संस्थांचे ते आजीवन सदस्य आहेत. मलेशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, नेपाळ, चायना, युरोप आदी देशांचा त्यांनी अभ्यासदौरा केला आहे. त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना विद्यापीठाच्या विविध प्राधिकारिणींवर काम करण्याचा प्रचंड अनुभव आहे.त्यांच्या या निवडीबद्दल विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विविध प्राधिकारिणींचे सदस्य, विद्यापीठातील प्रशासकीय व शैक्षणिक विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
सीबीसीएस प्रणाली केली होती: कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी आपल्या कार्यकाळात अमरावती विद्यापीठाला उच्च स्तरावर नेऊन ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था विद्यापीठे यांच्यासोबत करार केला होता. नवीन शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिकता यावे याकरीता त्यांनी अमरावती विद्यापीठात क्रेडिट बेस्ट चॉईस सिस्टीम सुद्धा लागू केली होती. आजारी असताना सुद्धा डॉक्टर मालखेडे यांनी सीबीसीएससाठी कसोटीने प्रयत्न करत प्राध्यापकांचे ट्रेनिंग घेतले होते.
हेही वाचा: Pro ViceChancellor of Amravati डॉ विजय कुमार चौबे अमरावती विद्यापीठाचे नवे प्र कुलगुरु