अमरावतीSant Gadge Baba Amravati University : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा सध्या सुरू आहेत. काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा संपल्या आहेत तर काहींच्या सुरू आहेत. तर पदव्युत्तर पदवी म्हणजे एम ए. च्या परीक्षा जानेवारी महिन्यात होणार आहेत. अशातच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठीची हॉल तिकीटं (Double Hall Ticket) विद्यापीठाकडून वितरित करणं सुरू आहे.
ॲडमिशन मराठीला अन् हॉल तिकीट एम.ए. इंग्रजी आणि मराठीचे शितलच्या नावाची दोन हॉल तिकीट : शितल बंदुके या नावाचे विद्यार्थिनीने सन २०२३-२४ सत्रासाठी श्री शिवाजी कला आणि वाणिज्य या महाविद्यालयात ( Shri Shivaji Arts & Commerce College Amravati ) एम. ए मराठी साठी प्रवेश घेतला आहे. परीक्षा तोंडावर असल्याने शितलने अभ्यासाची जोरदार तयारी सुरू केली आहे. पुढील महिन्यात परीक्षा असल्याने शितल हॉल तिकीट घेण्यासाठी महाविद्यालयात गेली असता तिला तिच्याच नावाची दोन हॉल तिकीट असल्याचं आढळून आलं. ज्या-ज्या अभ्यासक्रमाला तिने प्रवेश घेतला त्या विषयाचे एक हॉल तिकीट आहे, तर दुसरे हॉल तिकीट हे इंग्रजी विषयाचे आहे.
सध्या संत गाडगेबाबा विद्यापीठात CGS, NEP , CBCS या अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळं बराचसा गोंधळ सुरू आहे. तसेच विद्यापीठामध्ये मनुष्यबळाचा तुटवडा आहे. तांत्रिक अडचणीमुळं असा प्रकार होऊ शकतो. या संदर्भात तांत्रिक विभागाकडे माहिती घेऊन आपणास कळवितो - डॉ. मोना चिमोटे, अधिष्ठाता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
विद्यापीठाचा भन्नाट कारभार :यासंदर्भात विद्यार्थिनीनं बाजू मांडली. माझा प्रवेश एम.ए. मराठी अभ्यासक्रमाला असताना मला इंग्रजी विषयाचे हॉल तिकीट कसे आले? आता आपण एम.ए. मराठीचा पेपर द्यावा की एम.ए. इंग्रजीचा पेपर द्यावा असा प्रश्न तिच्यापुढे उभा राहिला आहे. एम. ए. मराठी साठी शिवाजी विज्ञान महाविद्यालय असे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. तर एम. ए. इंग्रजी विषयासाठी भारतीय महाविद्यालय असे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. विद्यापीठाच्या या भन्नाट कारभारामुळं शितल मात्र फार गोंधळून गेली आहे. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाशी बोलल्यावर मनुष्यबळाच्या तुटवड्यामुळं कदाचित असं झालं असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा -
- MPSC Hall Ticket Data Leak : एमपीएससी उमेदवारांचा हॉल तिकीट डेटा लिक, विद्यार्थ्यांची चौकशीची मागणी
- MPSC Hall Ticekts : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट लिक झाल्याचा व्हिडिओ व्हायरल, परीक्षा वेळेप्रमाणेच होणार
- MPSC Hall Ticket Data Leak: एमपीएससी डेटा लिक प्रकरणात अमित ठाकरे म्हणतात 'आयोगाने विश्वासार्हता जपायला हवी...'