अमरावती - तहान भागविण्यासाठी पाण्याच्या शोधात भटकंती करीत असताना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेडमध्ये हरणावर तीन कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. ग्रामस्थांना दिसताच त्यांना हरणाला कुत्र्यांच्या तावडीतून वाचवले.
अमरावतीच्या घुईखेडमध्ये तीन कुत्र्यांचा हरणावर जीवघेणा हल्ला - amravati news
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड गावचे बेडोंजी महाराज संस्थानच्या मागे पुनर्वसन झाले आहे. याच गावात कुत्र्यांना तीन ते साडेतीन वर्षाच्या हरणावर जोरदार हल्ला चढविला. यामध्ये हरणाच्या मानेला दुखापत होऊन एका पायाचे हाड तुटले.
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड गावचे बेडोंजी महाराज संस्थानच्या मागे पुनर्वसन झाले आहे. याच गावात कुत्र्यांना तीन ते साडेतीन वर्षाच्या हरणावर जोरदार हल्ला चढविला. यामध्ये हरणाच्या मानेला दुखापत होऊन एका पायाची हाड तुटले. हा प्रकार किसन ठोंबरे यांना दिसताच त्यांनी कुत्र्यांना हाकलून लावले आणि हरणाचे प्राण वाचवले. यानंतर हरणाला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून याबाबतची माहिती चांदूर रेल्वेच्या वनविभागाला दिली. वनविभागाचे वाहनाने हरणाला चांदूर रेल्वेला नेण्यात आले. त्याठिकाणी हरणावर पुढील उपचार होणार आहेत.