अमरावती - अमेझॉन या ऑनलाइन खरेदी संकेतस्थळावरून 38 हजारांचा कॅमेरा मागवला होता. पण, पार्सलमध्ये बॉडी स्प्रे पाठवून कंपनीकडून फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार धामणगाव रेल्वे शहरातील डॉ. असित पसारी सोबत घडला आहे.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरातील डॉ. असित पसारी यांनी अमेझॉनवरुन 38 हजारांच्या कॅमेऱ्याची ऑर्डर दिली होती. योग्य कालावधीनंतर स्थानिक वितरण प्रतिनिधी पंकज काळबांडे यांनी डॉ. असित पसारी यांना अमेझॉन कंपनीचे पार्सल आणून दिले. डॉ.पसारी यांनी लगेच पार्सल उघडले. त्यामध्ये कॅमेऱ्याऐवजी 5 बॉडी स्प्रे निघाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पसारी यांनी अमेझॉनच्या ग्राहक संपर्क केंद्राशी संपर्क साधून तक्रार नोंदविली. चौकशी करून सांगतो, असे ग्राहक केंद्राने सांगितले.