अमरावती- गेल्या काही दिवसांआधी जिल्हा सामान्य रुग्णालयात विष प्राशन केलेल्या एका रुग्णाला आणण्यात आले होते. मात्र, या रुग्णावर योग्य उपचार न केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे, महिला डॉ. जवादे यांच्यावर हलगर्जीपणाचा आरोप करत भीम आर्मीने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली होती. त्यावर, कारवाई करत शल्य चिकित्सक शामसुंदर निकम यांनी डॉ. जवादे यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.
महिला डॉक्टरला निष्काळजीपणा भोवला; जिल्हा शल्य चिकित्सकाने पाठविले सक्तीच्या रजेवर
लकी रामटेके असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. लकीने विष प्राशन केले होते. तो गंभीर परिस्थितीत असताना त्याला रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असताना देखील त्याला आय.सी.यूमध्ये न ठेवता जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता.
लकी रामटेके असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. लकीने विष प्राशन केले होते. तो गंभीर परिस्थितीत असताना त्याला रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असताना देखील त्याला आय.सी.यूमध्ये न ठेवता जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रुग्णाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या डॉक्टरावर कारवाई व्हावी, यासाठी भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे दालन ताब्यात घेत ठिय्या आंदोलन केले. आज पुन्हा भीम आर्मी संघटनेने जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेऊन डॉ. जवादे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यावर जिल्हा शल्य चिकित्सक शामसुंदर निकम यांनी डॉ. जवादे यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश दिले आहेत.