महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पोलिओच्या डोसप्रमाणे कोरोनाची लस घरोघरी जाऊन द्या' - mla ravi rana vaccination demand amravati

कोरोना लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पाल केल्या जात नाही. उपलब्ध लसींचे प्रमाण 100 ते 200 इतके असते. तर त्यातुलेनत 1000 पेक्षाही अधिक लोक रांगेत उभे असतात.

mla ravi rana
आमदार रवी राणा

By

Published : May 14, 2021, 3:30 PM IST

Updated : May 14, 2021, 3:46 PM IST

अमरावती -कोरोना लसीकरणसाठी अमरावती जिल्ह्यात लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावरुनच कोरोनाचा प्रसार होत असल्याचा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. तसेच यासाठी गर्दी टाळण्यासाठी आता प्रशासनाने पोलिओच्या डोसप्रमाणे कोरोनाची लससुद्धा घरा घरात जाऊन द्यावी, अशी मागणी यांनी केली आहे.

याबाबत बोलताना आमदार रवी राणा

कोरोना लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पाल केल्या जात नाही. उपलब्ध लसींचे प्रमाण 100 ते 200 इतके असते. तर त्यातुलेनत 1000 पेक्षाही अधिक लोक रांगेत उभे असतात. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने आता पोलिओच्या डोसप्रमाणे कोरोनाची लससुद्धा घराघरात जाऊन द्यावी, अशी मागणी आमदार राणा यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

हेही वाचा -'पीएम-किसान' योजनेचा आठवा टप्पा; आज मोदींच्या हस्ते होणार १९ हजार कोटी रुपयांचे हस्तांतर

१ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोना लस द्या - खासदार राणा

सध्या कोरोनाची लागण झपाट्याने वाढत असल्याने सरकार लसीकरणावर जास्त भर देत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची तिसरी लाट आली तर ती लहान मुलांकरिता धोकादायक असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकारने लहान मुलांच्या लसीकरणाबाबत विचार करावा, अशी विनंती खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांना बाधा झाली. त्यानंतर मध्यम वयातील लोकांना कोरोनाची लागण झाली. मात्र, पुढील कोरोनाच्या लाटेत लहान मुलांवर परिणाम होणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकारने 1 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची गरज असून सर्व मुलांचे तत्काळ लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा -'म्यूकरमायकोसिस गंभीर आजार; वेळीच उपचार करा, अन्यथा...'

Last Updated : May 14, 2021, 3:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details