अमरावती -भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सोपान कनेरकर यांचा एका महिला एसटी बस वाहकासोबत तिकीट काढण्यावरून काही दिवसांपूर्वी वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ही घटना समोर आली आहे. या व्हायरल व्हिडिओमधून महिला बसवाहक आणि कनेरकर यांच्यातील वाद समोर आला आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव सोपान कनेरकर हे काही दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकांना मोर्शी येथील बसस्थानकावर सोडण्यासाठी गेले होते. यावेळी सोपान कनेरकर यांनी महिला वाहकाला तिकीट काढण्यास सांगितले, दरम्या जोपर्यंत बस निघत नाही तोपर्यंत बसचे तिकीट काढणार नसल्याचे वाहकांनी सांगितले. यावरूनच दोंघामध्ये वाद झाला. हा वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
भाजपा पदाधिकाऱ्याचा महिला बस वाहकासोबत वाद कनेरकरांचे व्हिडिओवर स्पष्टीकरण
दरम्यान या व्हिडिओबाबत सोपान कनेरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी अनेक वर्षांपासून सार्वजनिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनामध्ये काम करत आहे. समाजाच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि उद्बोधनाच्या चळवळीमध्ये मी स्वतःला झोकून दिलेल आहे. आजपर्यंत जितकेही प्रबोधनाचे, लोकचळवळीचे, कार्यक्रम केले, त्यातून आपल्याला एकच लक्षात येईल की मी नेहमी नारी शक्तीचा सन्मान करत आलो आहे. त्यामुळे मी घटनेच्या वेळी या महिला वाहकाशी कुठलाही वाद घातला नाही, कींवा मी त्यांना काहीही बोललो नाही. मात्र माझे विरोधक मला बदनाम करण्याच्या हेतून हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने प्रसारीत करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -अकोल्यातील मेडिकलचा मदतीचा हात; ना नफा, ना तोट्यात विकत आहे रेमडेसिवीर इंजेक्शन