अमरावती - देशात व राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. केंद्र व राज्य सरकारने मजुरांच्या वाहतुकीला परवानगी दिली आहे. त्यामुळे दरोरोज हजारो मजूर हे मिळेल त्या वाहनाने आपल्या राज्यात जात आहेत. त्यामुळे वाहनांची गर्दीही टोल नाक्यावर वाढली असल्याने अमरावतीपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदगावपेठ टोल नाक्यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने वेळोवेळी सॅनिटयझरची फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जात आहे.
कोरोना दक्षता : अमरावतीच्या नांदगावपेठ टोल नाक्याचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण... - अमरावतीच्या नांदगावपेठ टोल नाक्यावर निर्जंतुकीकरण
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून टोल प्रशासनाकडून वेळोवेळी दक्षता घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या नांदगावपेठ टोल नाक्याच्या सर्व परिसरात वेळोवेळी सॅनिटाईझरची फवारणी करून परिसराचे निर्जंतुकीकरण केले जात आहे.
सध्या राष्ट्रीय महामार्ग ६ वर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी वाढलेली आहे. परराज्यातील मजूर आपल्या गावी परत जात आहेत. अशातच नांदगावपेठ टोल नाक्यावर अनेक मजूर काही वेळ विश्रांती घेतात. तसेच दूरवरुन वाहने व मजूर येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून टोल प्रशासनाकडून वेळोवेळी दक्षता घेतली जात आहे. टोल नाक्याच्या सर्व परिसरात वेळोवेळी सॅनिटायझरसची फवारणी करून परिसराचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. देशातील कोरोना संसर्ग आणि वाढणाऱ्या रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता जीव धोक्यात घालून टोल नाक्यावर काम करणारा कर्मचारीवर्गही विशेष खबरदारी घेत आहे.