अमरावती :जन्मतः दिव्यांग असणारे आणि अपघातामुळे दिव्यांगत्व आलेल्या अमरावती जिल्ह्यातील एकूण 54 हजार 627 दिव्यांग बांधवांनी, आपल्याला दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र (Disability certificate) मिळावे यासाठी 2016 पासून अर्ज केले आहेत. यापैकी 36 हजार 723 दिव्यांग व्यक्तींना हे प्रमाणपत्र (Disability certificate was distributed) जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने वितरित करण्यात (behalf of Amravati District General Hospital) आले आहेत.
प्रतिक्रिया देतांना डॉक्टर व श्याम राजपूत अर्ज भरताना असा घोळ :जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे (Amravati District General Hospital) दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. 2016 पासून आज पर्यंत एकूण 54 हजार 627 जणांनी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी अर्ज केला असल्याचा आकडा प्रत्यक्ष दिसतो. वास्तवात मात्र या 54,627 अर्जांपैकी 1408 अर्ज हे चुकीचे आहे. तर 11,094 अर्ज हे रद्द करण्यात आले आहेत. उर्वरित 4990 जणांनी ऑनलाइन अर्ज केला असला तरी, प्रत्यक्षात मात्र ते तपासणी करिता जिल्हा सामान्य रुग्णालयात आजपर्यंत आलेच नसल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद नरवणे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. आज देखील अर्ज करणारे व्यक्ती तपासणीसाठी आले, तर त्यांना प्रमाणपत्र मिळू शकते असे देखील डॉक्टर नरवणे म्हणाले.
तालुकास्तरावर राबविले जातात शिबिर :जिल्ह्यातील दिव्यांगांना शासनाने दिलेल्या जाहीर केलेल्या सुविधा मिळाव्या यासाठी त्यांना प्रमाणपत्र मिळावे म्हणून, तालुकास्तरावर शिबिर राबविले जाते. आता शुक्रवारी मोर्शी येथे शिबिर राबविले जाणार असून; मोर्शी तालुक्यातील दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी या शिबिराच्या माध्यमातून लाभ मिळेल असे देखील डॉक्टर नरवणे यांनी सांगितले.
या दिव्यांगांना मीळतो प्रमाणपत्राचा लाभ :दृष्टीहीन, कर्णबधिर, शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता, बहु दिव्यांगता, शारीरिक वाढ खुंटणे, स्वमग्नता, मेंदूचा पक्षघात, स्नायूंची विकृती, मज्जा संस्थेचे जुने आजार, अध्ययन अक्षमता, मल्टिपल, वाचा भाषा दोष, थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल आजार, ऍसिड अटॅक ग्रस्त, पार्किन्सन्स आजार, दृष्टीक्षणाता आणि कुष्ठरोग अशा 21 प्रकारातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त होऊ शकते.
दिव्यांगांना आहेत या अडचणी : ज्या व्यक्तीमध्ये दिव्यांगत्वाचे प्रमाण 40 टक्के आहे: अशा व्यक्तींना प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशी खंत प्रहार जनशक्ती दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष श्याम राजपूत यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलतांना व्यक्त केली. 40 टक्के किंवा त्यापेक्षा कमी अपंगत्वाचे प्रमाण असणाऱ्यांनी अपील केले तरी, त्यांना न्याय मिळत नसल्याची व्यथा देखील शाम राजपूत यांनी मांडली. जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींसाठी लिफ्टची सुविधा नाही, ही सर्वात मोठी गंभीर समस्या असल्याचे देखील शाम राजपूत म्हणाले. आमचे नेते आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला त्यांचा अधिकार मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे देखील शाम राजपूत यांनी सांगितले.