महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेळघाटात आढळले मृत बाळ, पोलिसांची शोध मोहीम सुरू - amravati disgtrict news

अमरातवीच्या धारणी शहरापासून उकूपाटी जवळील काटेरी झुडपास एक बाळ मृतावस्थेत आढळला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

पोलीस ठाणे
पोलीस ठाणे

By

Published : Jan 24, 2021, 3:49 PM IST

Updated : Jan 24, 2021, 4:36 PM IST

अमरावती -जिल्ह्यातील धारणी तालुक्यात उकूपाटी जवळील काटेरी झुडपात मृतावस्थेत बाळ आढळून आले आहे. धारणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत बाळाला उपजिल्हा रुग्णालयात ठेवले आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून घटनेचा पंचनामा केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात शोध सुरू आहे. अनैतिक संबंधातून हे बाळ जन्माला आले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षी धारणी शहरात मेळघाट बारच्या मागे एक स्त्री अर्भक आढळून आले होते.

हेही वाचा -मेळघाटातील 24 गावांचा अंधार दूर करण्यासाठी केंद्र सरकारशी लढा देणार - बच्चू कडू

Last Updated : Jan 24, 2021, 4:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details