महाराष्ट्र

maharashtra

धामणगाव रेल्वेत पुन्हा तीन कोरोना पॉझिटिव्ह, आंबेडकर नगर 'हॉटस्पॉट'

By

Published : May 20, 2020, 3:26 PM IST

धामणगाव रेल्वे शहरातील २१ वर्षीय तरुणी सोमवारी कोरोनाबाधित आढळल्यानंतर तिच्या आई व दोन बहिणींचा अहवालही मंगळवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे धवणेवाडी आंबेडकरनगर हा परिसर नवीन 'हॉटस्पॉट' म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर, तरुणीच्या वडिलांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तिच्या काका, काकू आणि त्यांच्या लहान मुलाचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला आहे.

धामणगाव रेल्वेत आंबेडकर नगर हॉटस्पॉट
धामणगाव रेल्वेत आंबेडकर नगर हॉटस्पॉट

अमरावती - धामणगाव रेल्वे शहरातील २१ वर्षीय तरुणी सोमवारी कोरोनाबाधित आढळल्यानंतर तिच्या आई व दोन बहिणींचा अहवालही मंगळवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे धवणेवाडी आंबेडकरनगर हा परिसर नवीन 'हॉटस्पॉट' म्हणून घोषित करण्यात आला आहे. या तरुणीच्या काका, काकू व त्यांच्या मुलांचा 'थ्रोट स्वाब' आज घेण्यात आला आहे.

धवणेवाडी आंबेडकरनगर परिसरातील नागपूर येथे इंजिनिअरिंगला असलेली २१ वर्षीय युवती कोरोना पॉझिटिव्ह आढळली. पूर्वीपासून तिच्यासोबत राहत असलेल्या दोन बहिणी व आईला आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते. त्यांचा अहवाल रात्री पॉझिटिव्ह आला. तर, वडिलांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहिती वर्धा येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी दिली.

या युवतीच्या काका, काकू आणि त्यांचा लहान मुलगा यांना परसोडी रस्त्यावरील कोविड सेंटरमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. त्यांचे थ्रोट स्वॅब अमरावती येथे पाठविण्यात येत असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे यांनी सांगितले. या युवतीची आई शहरातील तीन घरी घरकाम करीत होती. या तिन्ही कुटुंबांचे घरीच विलगीकरण केले आहे. या भागात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर निर्बंध घालले आहेत. जळगाव आर्वी या भागात मुंबईहून आलेल्यांच्या आरोग्याची काळजी आरोग्य प्रशासन घेत आहे.

ज्या एकाच कुटुंबातील चार सदस्य कोरोना बाधित आहेत. ते कुटुंब ३ मे पासून धामणगाव शहरात नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. तसेच, शहरातील इतर कोणत्याही भागात कोरोना संशयित रुग्ण नसून शहरवासीयांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार भगवान कांबळे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details