अमरावती - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज फडणवीस हे चिखलदऱ्याला जात असताना त्यांनी आसेगाव पूर्णा येथील एका शेत शिवारात जाऊन न उगवलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला. यावेळी राज्याचे माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे हे उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडून आसेगाव येथील सोयाबीन न उगवलेल्या शेताची पाहणी - अमरावती आसेगाव बातमी
ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही त्या शेताचा तात्काळ पंचनामा करून कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी केली आसेगाव येथील सोयाबीन न उगवलेल्या शेताची पाहणी
ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही त्या शेताचा तात्काळ पंचनामा करून कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
दरम्यान, सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील कोविड रुग्णालय व अकोला येथील कोविड रुग्णालय यांना भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला.