महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Yashomati Thakur Corona Positive : कोरोनाची लागण असतानाही यशोमती ठाकूर यांचे रुग्णालयातून कामकाज - यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना ( Yashomati Thakur tests positive for Covid-19 ) कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, असे असतानाही त्यांची काम करण्याची जिद्द आणि इच्छा तसूभरही कमी झालेली नाही. फायलींचा ढीग उपसून काम सुरूच ठेवल्याची माहिती एका चित्रफितीद्वारे समोर आली आहे.

Yashomati Thakur
यशोमती ठाकूर

By

Published : Jan 5, 2022, 10:17 AM IST

अमरावती -राज्यात दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच ओमायक्रॉन या व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री देखील कोरोनाच्या विळख्यात सापडताना दिसत आहेत. ज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना ( Yashomati Thakur tests positive for Covid-19 ) कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, असे असतानाही त्यांची काम करण्याची जिद्द आणि इच्छा तसूभरही कमी झालेली नाही. फायलींचा ढीग उपसून काम सुरूच ठेवल्याची माहिती एका चित्रफितीद्वारे समोर आली आहे.

रुग्णालयात यशोमती ठाकूर
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर अनेक आमदार, खासदार, मंत्री यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनाही यादरम्यान कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना चाचणी करण्याचे आवाहन करत स्वतः रुग्णालयात दाखल झाल्या. शासकीय रुग्णसेवेवर विश्वास दाखवत त्यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल होणे पसंत केले. शासकीय कर्मचारी, रुग्णालय यंत्रणा आणि शासकीय उपचार हे दर्जेदारच असतात. त्यांचा लाभ घेण्यात कुठेही कमीपणा अथवा संकोच न करता विश्वास ठेवल्य़ास नक्कीच फायदा होतो. हे सांगत सर्वांनी शासकीय रुग्णसेवेवर विश्वास ठेवावा, असे आवाहनही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केले होते.

सध्या त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. मात्र, त्यांनी रुग्णालयातही आपल्या दैनंदिन कामकाज सुरू ठेवल्याचे दिसते आहे. रुग्णालयातील बेडवर बसूनच त्या फायलींचा ढिगारा उपसत असल्याचे एका चित्रफितीद्वारे समोर आले आहे.

हेही वाचा -Sindhutai Sapkal passed away : अनाथांची माय काळाच्या पडद्याआड: आज दुपारी शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

ABOUT THE AUTHOR

...view details