अमरावती - जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात अवैध दारू विक्री विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक पेट्रोलिंग करत होते. शनिवारी माधान येथील पॉईंटवर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक देशी कट्टा, एक कार, एक चाईना चाकू असा एकूण एक लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अमरावतीच्या चांदूर बाजार येथे देशी कट्टा जप्त, तीन आरोपींना अटक - चांदूर बाजार बातमी
रचित कुंभारे, संकेत ढोले व एक अल्पवयीन तरुण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
रचित कुंभारे, संकेत ढोले व एक अल्पवयीन तरुण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींजवळ देशी कट्ट असल्याची माहिती पोलिसांना होती. त्याआधारे माधान येथे टी पॉईंटवर नाकाबंदी केली असता तेथे हुंडाई कंपनीची असेंट गाडी (क्र MH 06 W 3970) आली. त्यानंतर तपासणी केली असता, गाडीत एक देशी कट्टा, एक चायना चाकू व एक हुंडाई कंपनीची असेंट गाडी तसेच तीन मोबाईल असा एकूण 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमालासह 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, हे आरोपींनी देशी कट्टा कुठून खरेदी केला, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन यांच्या मार्गदर्शनात एपीआय अजय आकरे यांनी केली आहे.